संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी 20 पथके
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरात 17 जुलैपर्यंत सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी 20 पथकांची नियुक्ती केली आहे. शहरात सायंकाळी विनाकारण फिरणार्यांवर या पथकांमार्फत फौजदारी कारवाई होणार आहे.
नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अहमदनगर महापालिका, महसूल आणि जिल्हा पोली दलाचे 20 पथके तयार केली आहेत. या पथकांनी शहरात फिक्स पॉईंट देण्यात आली आहे. या पथकाद्वारे शहरात सायंकाळी सात वाजल्यानंतर विनाकारण फिरणार्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे. या पथकांचे समन्वय अधिकारी म्हणून महापालिकेचे उपायुक्त राहणार आहेत.
नगर शहरात या पथकाद्वारे सावेडीतील एकवीरा चौक, भिस्तबाग चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, ढवणवस्ती, बालिकाश्रम रोडवरील भुतकरवाडी, कल्याण रोडवरील नेप्तीनाका, कापडबाजारातील तेलीखुंट, दिल्ली दरवाजा, लालटाकी, कोठला बसस्थानक, पारिजात चौक, पांचपीर चावडी, रेल्वे स्टेशनवरील शिवनेरी चौक, केडगाव बायपास, आयुर्वेदिक कॉर्नर, केडगाव येथील हॉटेल रंगोलीसमोरील चौक, बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक, मार्केटयार्डमधील कोठी चौक, विजयलाईन चौक, भगवानबाबा चौक, मुठी चौक, मुकुंदनगरमधील इरिगेशन मशिद, पोलीस अधीक्षच चौक, भिंगारमध्ये वेश येथे हे पथके तैनात राहतील.
पथकांच्या कामकामावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
Post a Comment