पायलट यांच्यासह 18 सदस्यांना काँग्रेसकडून नोटीसमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राजस्थान सरकारमधील बंडखोर नेते सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या 18 जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

अविनाश पांडे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, सचिन पायलट आणि इतर 18 सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर विधिमंडळ पक्षातून आपलं सदस्यत्व रद्द करत आहेत असं समजलं जाईल.

देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता त्यांचा काही फायदा होणार नाही, असंही अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post