सलून असोसिएशनच्या सदस्यांना अध्यक्षांच्या हस्ते दरपत्रकांचे वाटपमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर जिल्हा सलून असोसिएशनच्या मार्च 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नवीन दरपत्रकाचे अनावरण प्रारंभी नगर शहरातील आराध्य दैवत श्री विशाल गणेश चरणी असोसिएशनचे संस्थापकीय मुख्य सदस्य बबनराव मदने यांच्या हस्ते अर्पण करुन नगर शहर, सावेडी उपनगरात अध्यक्ष अनिल निकम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. श्री.मदने यांनी ही दरपत्रके स्व:खर्चाने छापून सर्वत्र मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी सलून व्यावसायिकांना श्री.निकम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोरोना संकटात शासनाने आपल्याला दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. ग्राहकांच्या संपूर्ण शरीरावर मुबलक प्रमाणात सॅनिटायझर फवारणी करुन ग्राहक आणि सलून सेवक यांच्यात योग्य ते शारीरिक अंतर ठेवून सेवा द्यावी. विना अपॉईंटमेंट सलून सेवा देऊ नये. आलेल्या परिस्थितीने खचून न जाता सामोरे जावे, आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या दरपत्रकाचे वाटप प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रांतीय उपाध्यक्ष माऊली गायकवाड, कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, सचिव बापूसाहेब औटी, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष निलेश पवळे, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रपुर येथील गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील चौधरी व सांगली येथे विष पिऊन जीवन संपवलेले नवनाथ साळूंके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बाळासाहेब भुजबळ यांनी सलून कारागिरांना नवीन दरपत्रकाप्रमाणे ग्राहकांकडून आपल्या अडचणी सांगून दर घ्या. हतबल होऊ नका, धीर धरा, खचून न जाता सरकारकडे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करा, शासन आपल्याला निश्‍चित मदत करीन, असे सांगितले. याप्रसंगी बापूसाहेब औटी, ज्ञानेश्‍वर निकम, दिपक बिडवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या दरपपत्रकाचे मोफत वाटप सर्वत्र होईल. ज्यांना मिळाले नाही, त्यांनी अध्यक्ष निकम (मो.9730979977) संपर्क साधून घेऊन जावे. याप्रसंगी संदिप वाघमारे, राजेंद्र ताकपेरे, जीवन सोन्नीस, मयूर आहेर, मच्छिंद्र कासवत, गोरख कासवत, प्रविण वाकचौरे, अक्षय कलंके आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post