पॅनकार्ड अपडेट करायचंय?
माय अहमदनगर वेब टीम
सर्व वित्तीय कामांसाठी पॅनकार्ड खूप गरजेचे असते. जे आयकर विभागाकडून दिले जाते. एरवी पॅनकार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर बराच वेळ जात होता. ठराविक रकमेच्या वर रक्कम काढायची असेल अथवा कुणाकडून येणार असेल तर सर्वप्रथम पॅनकार्ड मागितले जाते. म्हणूनच पॅनकार्ड वरील माहिती बरोबर असणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आता जर तुम्हाला काही अपडेट करायचे असेल तर अॅपद्वारे तुम्ही करू शकणार आहात अशी माहिती समोर आली आहे.
भारत सरकारने उमंग अॅपद्वारे पॅनकार्डची माहिती अपडेट करता येणार असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर आपण आता आपल्या फोनवरून करू शकणार आहोत. यासाठी उमंग अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामार्फत तुम्ही कोणताही बदल करू शकणार आहात. तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख असा कोणताही बदल करता येणार आहे. पद्धतही अगदी सोपी आहे.
अॅप डाऊनलोड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करायचे, त्यानंतर माय पॅन टॅब अथवा चेंज कनेक्शन मध्ये जायचे आहे आणि हवा तो बदल करायचा आहे. इतक्या सोप्या पद्धतीने हे करता येणार आहे. पण यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ही जवळील पण सेंटरला जाऊन करावी लागणार आहे. किंवा एनएसडीएल टीआयएन केंद्रावर जाऊन त्याची पूर्तता करावी लागणार आहे तसेच त्याची फी देखील भरावी लागणार आहे जी ऑनलाईन भरता येऊ शकणार आहे.
Post a Comment