भाजपमध्ये बदल / तीन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भाजपने मंगळवरी राज्यस्तरावर पक्षात मोठे बदल केले आहेत.दिल्ली, छत्तीसगड आणिमणिपुरचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत.दिल्लीत मनोज तिवारींच्या जागीउत्तर दिल्लीचे महापौर आदेश गुप्ता यांनाअध्यक्षपद देण्यात आले आहे. छत्तीसगडमध्येविक्रम उसेंडी यांच्या जागीविष्णुदेव साय आणि मणिपुरमध्ये भावनानंद सिंह यांच्या जागीएस टिकेंद्र सिंह यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे.
मनोज तिवारी यांना सोमवारी दिल्ली सरकारविरोधात निदर्शने करताना अटक झाली होती.तिवारी यांनी केजरीवालांवर आरोप लावले होते की, दिल्ली सरकार कोरोनाविरोधातील लढाईत सक्षम नाही, यामुळेच दिल्लीतील रुग्णसंख्या वाढत आहे.
दिल्ली भाजपचे अनेक नेते ताब्यात

मनोज तिवारींनी राजघाटजवळ आंदोलन केले होते. येथे दिल्ली भाजपचे महामंत्री कुलजीत चहल आणि अशोक गोयलदेखील उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी या सर्वांनाच ताब्यात घेतले. पोलिसांनी तिवारी यांच्यासोबत बसलेल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गाडीत टाकून प्रसाद नगर पोलिस स्टेशनमध्ये नेले होते.
तिवारी म्हणाले होते- केजरीवाल राज ठाकरे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत

मनोज तिवारी यांनी केजरीवाल सरकारवर आरोप लावला होता की, ते राज ठाकरे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कामाऐवजी राजकारण करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post