आषाढी वारीमय व्हा, अभ्यास करा, परीक्षा द्या अन बक्षिसे मिळावा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : लोकरंग वाचन चळवळीच्या यापूर्वी घेतलेल्या परीक्षेत ३८५३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आताही याच अभियानांतर्गत ऑनलाईन आषाढी वारी ही खास परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संत विचारांचे बाळकडू मिळणार तर आहेच पण अभ्यास करून परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वांचे कौतुक आणि काहींना खास बक्षिसेही दिली जाणार आहेत. या परीक्षेत सहभागी होण्यासाठीचे आवाहन ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी केले आहे.

त्यांनी या परीक्षेबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आषाढी-कार्तिकी वारी म्हणजे महाराष्ट्राचे खरेखुरे सांस्कृतिक वैभव. वारी ही परंपरा आहे सामाजिक समतेची आणि भक्तीभावाची.. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असलेली ही भक्ती परंपरा. पण यंदा करोनाच्या संकटामुळे ही विचारांची वारी पंढरीला जाणार नाही. पण अशावेळी आपल्याच ‘घरात कानडा विठ्ठलू’ येऊ शकतोच की.. बरोबर ना..? ही आपल्याला संधी चालून आली आहे वेगळ्या पद्धतीने आणि सामाजिक भान लक्षात घेऊन वारी साजरी करण्याची. त्यामुळे यंदा विठ्ठलाचे स्मरण आपण आपल्याच घरी करूया आणि चिमुरड्यांना वारकरी संप्रदायाद्वारे बाळकडू पाजूया.

लोकरंग फाउंडेशन आणि युवक प्रबोधन समिती घेणार आहे एक विशेष परीक्षा. ही परीक्षा आहे आपल्या पाल्यांच्या भविष्याच्या दिशादर्शनाची आणि ज्ञानार्जनाची. पहिली ते आठवीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त ₹ 50 रुपये सेवाशुल्क आहे. (*जमा झालेल्या सेवाशुल्क रकमेतून बक्षीस दिले जातील. तसेच यासाठी आपण जास्तही देणगी अर्थात डोनेशन देऊन सहकार्य करू शकता. या रकमेतून गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे) सेवाशुल्क भरून आपण आपला अर्ज या स्पर्धा परीक्षेसाठी भरू शकता. मग विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या इमेल व व्हाट्सएप नंबरवर या परीक्षेसाठीची इबुक पुस्तके, व्हिडीओ आणि इतर अध्ययन सामुग्री आम्ही पाठवू, अशी माहिती संतोष वाघ महाराज यांनी दिली आहे.

वाघ महाराजांनी म्हटले आहे की, ‘ऑनलाईन आषाढी वारी’ या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून गुगल डॉक्सच्या पुढील लिंकवर क्लिक करा. परीक्षा अर्ज भरण्यासाठी या लिंकवर जा. विद्यार्थी, पाल्य किंवा इतर कोणीही हा संबंधित विद्यार्थ्यांचा हा परीक्षा अर्ज भरू शकतात. वटपौर्णिमेच्या (शुक्रवार, दि. 5 जून 2020) दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण हा परीक्षा अर्ज भरू शकता. त्यानंतर दोन-तीन दिवसात (दि. 6 ते ८ जून 2020 या कालावधीत) सर्व परीक्षार्थींना स्टडी मटेरीअल व आणि त्याच्या लिंक पाठवण्यात येईल. आषाढी एकादशी झाली की गुरुपौर्णिमेच्या दिवशी (रविवार, दि. 5 जुलै 2020) रोजी दुपारी (१२ ते २ वाजेपर्यंत) 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक गटात सर्वाधिक गुण मिळवलेल्या 15 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येतील. तसेच सहभागी होऊन किमान 50 % गुणांसह उत्तीर्ण झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

परीक्षेचे गट :

1. पहिली-दुसरी

2. तिसरी-पाचवी

3. सहावी-आठवी

बक्षिसांचे स्वरूप (प्रत्येक गटासाठी स्वतंत्र)

पाहिले बक्षीस : पुस्तक संच (₹ 1000/-)

दुसरे बक्षीस : पुस्तक संच (₹ 700/-)

तिसरे बक्षीस : पुस्तक संच (₹ 500/-)

12 जणांना उत्तेजनार्थ बक्षीस : पुस्तक संच (₹ 300/-)

उत्तीर्ण (किमान 50 टक्के) झालेल्या सर्वांना पार्टीसिपेशन सर्टिफिकेट

परीक्षा शुल्क भरण्यासाठी https://www.payumoney.com/events/#/buyTickets/ashadhi_wari_exam या लिंकवर क्लिक करा. किंवा आपण ९४२२२१५६५८ या क्रमांकावर गुगल पे किंवा पेटीम यांच्या मदतीनेही ५० रुपये हे परीक्षा शुल्क भरू शकता. फ़क़्त पैसे भरलेला स्क्रीनशॉट आणि विद्यार्थ्यांचे नाव, संपर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर पाठवून द्यावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post