सिना नदीला या वर्षी दुसर्‍यांदा आला पुर



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहर परिसरात रविवारी (दि.28) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला या वर्षात दुसर्‍यांदा पुर आला. नगर-कल्याण रोडवरील पुलावरुन पाणी वाहिल्याने सोमवारी (दि.29) सकाळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 8 वाजेच्या नंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत झाली.

नगर शहर व परिसराला गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शुक्रवारी (दि.26) पहाटे नागापूर तसेच भिंगार परिसरात अतीवृष्टी झाल्याने सिना नदी व भिंगार नाल्याला यावर्षी पहिल्यांदा पूर आल्याचे पहावयास मिळाले होते. यानंतर शनिवारी (दि.27) सायंकाळी तसेच रविवारी (दि.28) रात्रीही शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. सिना नदीचे उगमस्थान असलेल्या ससेवाडी (जेऊर) परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सिना नदीला दुसर्‍यांदा पूर आला होता. या पुराचे पाणी कल्याण रोडवरील पुलावरुन वाहत होते त्यामुळे सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नगर शहर परिसरात नालेगाव मंडलामध्ये 19.25 मिमी, सावेडी परिसरात 25.25 मिमी, केडगाव मंडल परिसरात 27.50 मिमी, भिंगार मंडल परिसरात 14 मिमी, नागापूर 5.25 मिमी, कापूरवाडी 27 मिमी, जेऊर 8 मिमी, वाळकी 31.75 मिमी, चास 0.5 मिमी, रुईछत्तीशी 10 मिमी असा पाऊस रविवारी रात्री झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी 15.67 मिमी पाऊस

रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी 16.67 मिमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये नगर 16.5, पारनेर 15.31, श्रीगोंदा 8.25, कर्जत 15.58, जामखेड 19.90, शेवगाव 18.88, पाथर्डी 13.38, नेवासा 41.34, राहुरी 14.54, संगमनेर 6.15, अकोला 0.06, कोपरगाव 15.35, श्रीरामपूर 48.63, राहाता 19.90 एवढा पाऊस झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post