या दिवशी दिसणार दिसणार दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – 5 जूनला झालेल्या चंद्रग्रहणानंतर याच महिन्यात येत्या 21 जूनला सूर्यग्रहण होणार आहे. हे दुर्मिळ असे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. या वर्षी चार चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार आहेत. त्यापैकी 10 जानेवारी आणि 2 जून रोजी दोन चंद्रग्रहण झाली आहेत. आता 21 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि वर्षातील तिसरे ग्रहण होणार आहे.

भारतामध्ये काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. संपूर्ण आयुष्यात क्वचितच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते. भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हे खंडग्रास सुर्यग्रहणाच्या स्वरूपात पाहता येणार आहे. उत्तराखंडच्या जोशी मठ, डेहराडून तसेच हरियाणाच्या कुरुक्षेत्र, पोहोवा, इटिया या भागातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दिसणार आहे. देशाच्या इतर भागांतून खंडग्रास स्थिती दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात सकाळी 10 ते 1.28 या काळात हे ग्रहण दिसणार आहे.

सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होणार आहे. दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सर्वोच्च स्थितीमध्ये असेल, तर दुपारी 3 वाजता हे संपणार आहे. म्हणजेच हे सूर्यग्रहण जवळपास सहा तास चालणार आहे. हे सूर्यग्रहण पाहू इच्छिणार्‍या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकता, यात शंका नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post