...तर पुर्नपरीक्षा घेणार्‍या शिक्षण संस्थेवर कारवाई



माय अहमदनगर वेब टीम
पुणे – पुण्यातील तळेगावात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत अकरावीची पुर्नपरीक्षा घेतली जात होती. यावेळी प्रशासनाने छापा टाकून या शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्ष वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, या शैक्षणिक संस्थेने प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत सर्रास पुर्नपरीक्षा घेतली.

तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समध्ये लॉकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचे उल्लंघन करत अकरावीची पुनर्परीक्षा घेतली जात होती. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकत कारवाई केली.

मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक अशा एकुण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासकीय एस. एम. गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या ठिकाणी एकूण 27 विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना केलेल्या आवाहनानंतरही सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करणार्‍या कुठल्या शैक्षणिक संस्थेवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post