कॉलेजला जाणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी



माय अहमदनगर वेब टीम
पुणे – 1 सप्टेंबरपासून प्रथम वर्ष तर 1 ऑगस्टपासून इतर वर्षांचे वर्ग ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी पूर्वतयारी करावी. तसेच हे शिक्षण कसे दिले जाणार आहे. याचा आराखडा तयार करा असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने सर्व महाविद्यालयांन दिले आहेत.

राज्यात सर्वत्र करोनाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकार आणि विद्यापिठे प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे यंदाचे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू केले जाणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने तयारी सुरू केली आहे.

त्यानुसार त्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी मुडल अथवा गुगल, क्लासरूम, ई-लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून शिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याची पूर्वतयारी करावी. त्यासाठी आराखडा तयार करून त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात जी महाविद्यालये, शिक्षक आणि कर्मचारी आहेत.त्यांना वर्क फार्म होम सुविधा उपलब्ध करून द्यावी. या शिक्षकांनी घरातूनच आवश्यकतेनुसार काम करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालयांना ही तयारी करावी लागणार
शिक्षकांनी अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी ज़ून उत्तरार्थ आणि जुलै महिन्यात करावी.
विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणार्‍या साधनांची माहिती घ्यावी
संयुक्त पध्दतीने शिकवण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बॅच कराव्यात. यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post