पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा लोकांनाच परवानगीमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल तब्बल तीन महिन्यानंतर परत रुळावर येणार आहे. लॉकडाऊनमुळे थांबलेली मुंबई हळु-हळू अनलॉक केली जात आहे, याच पार्श्वभूमिवर लोकल पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतू, ही लोकल ट्रेनमधून पक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. आज (15 जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुटल्या. मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. सुमारे 1.25 लाख कर्मचारी या सेवेचा लाभ घेतील. मात्र सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करू शकणार नाहीत. या रेल्वे प्रवासासाठी तिकीट काऊंटवर आधी ओळखपत्र दाखवावे लागेल, त्यानंतरच तिकीट दिलं जाईल. रेल्वे आणि राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करीत आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

कोणत्या रुटवर किनी ट्रेन्स
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेटवरुन दहानु रुटवर एकूण 73 टेन्स चालतील. विरार आणि डहानू रोड स्टेशन्सदरम्यान 8 ट्रेन्स चालतील. या ट्रेन्स सकाळी 5.30 वाजेपासून रात्री 11.30 पर्यंत चालतील. काही ट्रेन्स दहानुपर्यंतच असतील. चर्चगेट आणि बोरीवलीसाठी काही फास्ट लोकल चालवल्या जातील. बोरीवलीनंतर पुढील स्टेशनवर वेग कमी होईल.
मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या एकूण 200 लोकल चालवल्या जातील. लोकल 100 अपु रुट आणि 100 डाउन रुटवर चालतील. सीएसएमटीवरुन कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे स्टेशन्सदरम्यान 130 लोकल चालतील. यातील 65 अप आणि 65 डाउन लाइनवर असतील.
लोकल ट्रेनच्या प्रवासातील नियम
फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी.
कर्मचाऱ्याने सरकारी ओळखपत्र दाखवल्यानंतरच तिकीट मिळेल.
पासधारकांची अवधी वाढवण्यात आली आहे.
ओळखपत्र दाखवल्यानंतरच स्टेशनमध्ये प्रवेश मिळेल.
कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास जारी केले जातील.
कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी आहे का नाही, याची खात्री केली जाईल.
सोशल डिस्टेंसिंगसाठी 1200 क्षमतेच्या रेल्वेमध्ये 700 लोकांनाच प्रवेस दिला आहे.
रेल्वे स्टेशन क्षेत्रात 150 मीटरपर्यंत कोणत्याच फेरीवाल्याला परवानगी नसेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post