मास्क न लावणार्या विरोधात पोलिसांनी केली ही कारवाई
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता फिरणार्या नागरिकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत केडगाव येथे मंगळवारी (दि.16) सहा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी केडगाव परिसरातील सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणार्या व मोटारसायकलवर डबलसिट जाणार्या विश्वनाथ भाऊसाहेब साठे (वय-29, रा. तराडी मळा, अकोळनेर ) हा मोटारसायकल (क्र. एम एच 16 एक्स 7918) वरून मास्क न लावता डबलसिट जाताना आढळुन आला. तसेच गणेश राजु केदारे (वय-21, रा. दुधसागर सोसायटी, केडगाव), ऋषिकेश गणेश धाडगे (रा. शाहुनगर), संतोष रामदास भगत (रा. बाबुर्डी घुमट), अमित अनिल भोसले (रा. शास्त्रीनगर), रामदास किसन कलापुरे (रा. अरणगाव) यांना केडगाव परिसरात मास्क न वापरता विनाकारण फिरून शासनाच्या आदेशाचा भंग करताना आढळुन आल्या प्रकरणी त्यांच्या विरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 188, 262 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहेत.
Post a Comment