मोठी बातमी ; अहमदनगरमध्ये एकाच दिवसात 20 जणांना कोरोनाची लागण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर मध्ये कोरोना बधितांनी आज उच्चांक गाठला असून अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुपारी 11 जणांना तर आत्ता उशिरा ९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.
नगर शहरातील सहा जणांचा समावेश. यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात पत्नी आणि मुलीचा समावेश.याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील 42 वर्षीय पुरुष आणि केडगाव येथील 29 वर्षीय युवक यांनाही कोरोनाची लागण.
*संगमनेर शहरातील जुने पोस्ट ऑफिस येथील 36 वर्षाची महिला आणि अडीच वर्षे वयाचा मुलगा बाधित.
*अकोले तालुक्यातील बोरी येथील साठ वर्षीय महिला बाधित.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७२ वर पोहोचली आहे.
Post a Comment