देशात कोरोना रुग्ण 2 लाखांच्या पुढे; अद्याप उच्चांकी पातळी नाहीमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला. केवळ १५ दिवसांत रुग्णसंख्या १ लाखावरून २ लाखांवर गेली. मंगळवारी ८,१४७ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३२१ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबळींचा आकडा ५,७३९ वर गेला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशात काेरोनाचा संसर्ग अद्याप सर्वाेच्च पातळीवर नाही. संसर्ग रोखण्यासाठी उचललेली पावले ख्ूपच फायदेशीर ठरली आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे. जगभरात भारतासह अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन व इटलीतच दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तथापि, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, फक्त रुग्णसंख्येकडे बघून भारत जगातील ७ सर्वाधिक रुग्णसंख्येच्या देशात आहे, असे म्हणणे चूक आहे. अशी तुलना करताना देशांच्या लोकसंख्येकडेही पाहिले पाहिजे. भारताइतकी एकत्रित लोकसंख्या असलेल्या १४ देशांत भारताच्या तुलनेत ५५.२ पट जास्त मृत्यू झाले आहेत. ते म्हणाले, भारतात मृत्यूदर २.८२%, तर जगभरात ६.१३% आहे. प्रति लाख लाेकसंख्येमागे मृत्यूदर ०.४१% आहे, तर जगात तो यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे ४.९% आहे. दिल्लीत १ दिवसात सर्वाधिक १,२९८ रुग्ण आढळले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post