या अभिनेत्रीला कोरोनाची लागण



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मोहेना कुमारी हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या तिच्या कुटुंबियांसह आणखी 17 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मोहेना उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सुन आहे. सतपाल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये मोहेनासह आणखी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे या सर्वांना आता क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मोहेनाने 15 ऑक्टोबर 2019 रोजी हरिद्वारमध्ये उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचे धाकटे पुत्र सुयश रावत यांच्याबरोबर लग्न केले. मोहेन ही रीवाचे महाराजा पुष्पराज सिंग जुदेव यांची मुलगी आहे. शिवाय ती 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली आहे. रेमो डिसोझा दिग्दर्शित ‘एबीसीडी: एनी बडी कॅन डान्स’ या चित्रपटातही तिने काम केले आहे. तिने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधील स्पर्धकांसाठी कोरोग्राफीदेखील केली आहे. लग्नानंतर तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला राम-राम ठोकला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post