ठाकरे सरकार ‘कोरोना’चे संकट रोखण्यात अपयशीमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोरोनाचे आलेले संकट रोखण्यात अपयशी ठरत आहे. केंद्र सरकाने वेळोवेळी सरकारला भरपूर सहकार्य केले आहे. मात्र केवळ केंद्र सरकारला श्रेय जाईल म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या उपाययोजना व सुविधा जनते पर्यंत पोहोच करत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्थांची संख्या सर्वात जास्त आहे. देशात ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे त्या राज्यातील स्थिती पाहता आपल्या राज्यात असलेली स्थिती अत्यंत बिकट आहे. राज्यातील जनतेचे कोरोनापासून बचाव व्हावा यासाठीच भारतीय जनता पार्टीने या अपयशी आघाडी सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते वसंत लोढा यांनी केले.
नगर शहरात भाजपच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आज ठीकठिकाणी आंदोलने करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील निवास्थानी मोजक्या कार्यकर्त्यांसह काळे वस्त्र व काळा मास्क लाऊन निषेध केला. यावेळी सागर शिंदे, शिवा शिंदे, ज्ञानेश्वर भांगे, राम वाडेकर आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post