मद्यधुंद ट्रक चालकाने पोलिसांचा चेकनाका उडविला



माय अहमदनगर वेब टीम
रांजणगाव देशमुख - नाशिक येथून कोपरगावच्या दिशेने येणारा ऑक्सिजनच्या सिलेंडरने भरलेले आयशर ट्रक (क्र. एमएच 17 टी 2835) वरील मद्यधुंद ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने नाशिक नगर सरहद्दीवर असलेले चेकपोस्ट उडवून नगरच्या हद्दीत येऊन ट्रक उलटला. यात एक शिक्षक जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

दोन्ही जिल्ह्यातील पोलीस बचावले आहे. मद्यधुंद ट्रक चालकास वावी पोलिसांनी अटक केली आहे. वावीचे जखमी शिक्षक सुनिल बाबुराव डुकरे यांना उपचारासाठी सिन्नर येथे नेण्यात आले होते तेथून नाशिक येथे हलविले आहे. करोनाच्या नगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पाथरे फाटा येथे नाशिक व नगर पोलिसांचे आपापल्या हद्दीत चेकनाके उभारण्यात आले आहे. या अपघातात पशुसर्वधन विभागाचे जनार्दन वाकळे यांची अ‍ॅक्टीव्हा चक्काचूर झाली आहे.

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक हद्दीतील वावी पोलीस ठाण्याचे पाथरे फाटा या चेकपोस्टवर चार पोलीस, आरोग्य विभाग, पशुसर्वधन, शिक्षक असे सात जण कर्तव्यावर होते. तर कोपरगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस अशोक शिंदे, ढाकणे व 3 होमगार्ड व पशुसर्वधन विभागाचे वाकळे चेकनाक्यावर कर्तव्यावर होते. घटनेनंतर त्याठिकाणी शिर्डीचे पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव ग्रामिणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post