युद्धपातळीवर प्रयत्न करा; निधी कमी पडू देणार नाही – ना.अजित पवार


माय अहमदनगर वेब टीम
पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या वाॕर रुम ( डॅश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतली व उपयुक्त सूचना केल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे.याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण, शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र,वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी मिळते. त्यामुळे उपाययोजना करणे सोपे जाते. अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी मिळू शकते अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.

अप्पर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याठिकाणी निरंतर काम चालू असते शिवाय बेडची उपलब्धता, भविष्यात लागणारे बेडस् ,डाॕक्टरांची संख्या या डॅश बोर्डवर पाहायला मिळते त्यामुळे तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाते असे सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post