महामार्गावर वाहन अडवून चालकास लुटणारी टोळी जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना अडवून मारहाण करून लुटणारे सरईत चोरट्यांची टोळी पकडण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या मध्ये आरीफ गफूर शेख (वय २५, रा.अवघड पिंप्री ता.राहुरी), सागर गोरख मांजरे (वय २४, रा.मातापूर ता.श्रीरामपूर ह.रा.शिवाजीनगर कल्याण रोड, अहमदनगर), अविनाश श्रीधर साळवे (वय २२, राहुरी काँलेजच्या पाठीमागे, राहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय २३, रा. पिंपळवाडीरोड, राहाता), चेतन राजेंद्र सणासे (वय १९, रा.पिंपळवाडी रोड, राहाता), अक्षय सुदाम माळी (वय २२, रा.खंडोबा चौक, राहाता), अक्षय सुरेश कुलथे (वय २०, रा.इंगळे ईस्टेट, मल्हारवाडीरोड, राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्र (वय २२, रा.धोमारी खुर्द, राहुरी) यांच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगा आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, वरील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणीवरुन पाठलाग करून ताब्यात घेतले. या आरोपींनी लोणी व कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली १ लाख २० हजार रु.च्या दोन बिना नंतरच्या पल्सर दुचाकी, ३० रु.ची बिना नंतरची स्पेलडर, २ हजार रु.एअर गण असा १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपी रात्री राहुरी येथे एकत्र येत होते. यानंतर तीन दुचाकीवरून पिंपळवाडीरोड (ता.राहाता) येथे सुखदेव मोरे यांच्या घरी व शेतात मुक्कामी थांबत होते. रात्री पहाटे ३ वाजल्यानंतर तिन्ही दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गावर येऊन एकट्या जाणाऱ्या वाहनचालकाची रेकी करून त्याचा पाठलाग करीत असत. यानंतर दोन्ही दुचाकीवरील सहाजणांनी वाहन अडवून चालकाला चाकू, लोंखडी कत्ती आणि एअर गणचा धाक दाखवून मारहाण करून लुटणे, एक दुचाकीवरील तिघांनी वाहन अडविल्यानंतर समोरुन व पाठीमागून येणाऱ्या वाहनांवर व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवले जाते होते. लुटमार करणाऱ्या साथीदारांना सावध करणे, गुन्ह्याची माहिती तात्काळ कुणाला सांगू नये, यासाठी चालकांचा मोबाईल काढून तो फोडून फेकून दिला जात असे. गुन्हा करताना रेकी करण्याचे काम आरोपी आलटून पालटून ते करीत असत. या आरोपींमध्ये अविनाश साळवे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात ६ तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात १ असे गुन्हे दाखल. सागर मांजरे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात १०, एमआयडीसी, राहुरी, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. आरिफ शेखवर राहुरी, एमआयडीसी, सोनई पोलीस ठाण्यात, अक्षय माळी यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात, अक्षय कुलथे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात तर सागर हरिश्चंद्र यांच्या वर हडपसर, दिधी (पुणे), नगर तालुका, राहुरी व सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे-कांबळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, सफौ. नानेकर, पोहेकाँ मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोना संदीप कर्डीले, दीपक शिंदे, रवि सोनटक्के, संतोष लोढे, विशाल दळवी, रणजित जाधव, राहुल सोळुंके, मयुर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, किरण जाधव, सागर सुलाने, चापोहेकाँ संभाजी कोतकर, सचिन कोळेकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post