राज्यातील पहिल्या कोरोना मोबाईल टेस्टिंग बसच्या निर्मितीत अहमदनगरच्या युवकाचे योगदान


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 11 हजार 500 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील वेगानं वाढणार्‍या कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस तयार करण्यात आली आहे. ही पहिली बस मुंबईत कार्यरत झाली असून या पहिल्या या बसच्या निर्मितीत नगरच्या युवकाने योगदान दिले आहे.

पुण्यातील कृष्णा डायग्नोस्टिक लॅब आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणं ही कोव्हिड-19 टेस्टिंग बस तयार केली आहे. आर्या ट्रान्सपोर्टने यासाठी बस उपलब्ध करून दिली आहे. या बस चे संपूर्ण ग्राफिक डिझाईन, प्रिंटींग आणि व्हीनाईल रॅपिंग हे नगर जवळील सारोळा कासार गावचे रहिवासी असलेले अभिजित अशोक कडूस पाटील यांनी केले आहे. पाटील यांचा पुण्यातील हडपसर येथे इमेज क्रिएशन या फर्मच्या नावाने प्रिंटींग व्यवसाय आहे. कोरोनाच्या पहिल्या मोबाईल बसच्या निर्मितीत योगदान देता आल्याचे मोठे समाधान असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता मुंबईला पहिली मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस देण्यात आली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार आहे. वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बृहमुंबई नगरपालिका (बीएमसी) चे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी (दि.१) या बसचं उद्घाटन केलं.

कोव्हिड-19 टेस्टिंग बसमध्ये कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. यासह या बसमध्ये एक्स-रे परीक्षेची सुविधादेखील उपलब्ध आहे. ज्या बसमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे एक लहान चेंबर बनविला गेला आहे.

मुंबईत कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणात तपासणीची गरज भासू लागली. ही गरज लक्षात घेता प्रथम कोव्हिड-19 टेस्टिंग बस मुंबईला देण्यात आली आहे. कोरोनो व्हायरस शोधण्यासाठी 2 कॉम्बीनेशन सेच्यूरेशन वापरेल आणि Al बेस्ड एक्स-रे देखील वापरेल.

कोव्हिड-19 टेस्टिंग बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधासह सुसज्ज आहे. या मदतीनं झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागात कोरोना चाचणी करणं खूप सोपं जाईल. यासह, स्क्रीनिंग दरम्यान उच्च धोका असलेल्या संशयितांना अलग ठेवणं देखील सोपं होईल. क्लाऊड ट्रान्सफॉर्मच्या मदतीनं रेडिओलॉजी विभागाचे तज्ञ आणि डॉक्टर आता कोरोनो विषाणूचे रुग्ण सहज शोधू शकतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post