कोरोनावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले




माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - राष्ट्रीय स्वयम सेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी सायंकाळी कोविड-19 महामारीविषयी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, आता आपणा सर्वांना आता स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. देशातील सर्वांनी विदेशी उत्पादने सोडून, स्वदेशीचा अवलंब करावा. कोरोना संकटाला संधी समजून आपल्याला नवीन भारत तयार करायचा आहे. कोरोनाच्या लढाईत कोणताही भेदभाव न करता आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे. सर्वांनी एकत्र राहून नवीन भारत तयार करण्याच्या दिशेने पुढे जायचे आहे.
भागवत यांच्या संबोधिनातील प्रमुख मुद्दे
'सरकारने दिलेल्या सूचना सर्वांसाठी आहेत. काही विशिष्ट परिस्थिती सर्वांनाच लाभ मिळावा, याकडेही लक्ष द्यायला हवे. नागरिकांनी आपल्या सवईकंडे लक्ष द्यायला हवे. सर्वांना या महामारीचा अनुभव झाला आहे, याबाबत जनजागृती करण्याकडे सर्वांचा कल असायला हवा. आपल्याला धैर्य ठेवावे लागेल. किती दिवस असाच विचार करू नका, काम करत राहा. आळशी बनू नका, तत्परतेने काम करा. भारताने कोरोनावर तात्काल उपाय केला, त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांप्रमाणे वाढला नाही.'
आजारपण लपवू नका
'नागरिकांनी भिण्याचे कारण नाही, क्वारेंटाइन करणे म्हणजे तुम्हाला जगापासून तोडत नाहीयेत. आपले आजारपण लपवू नका, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. कोरोनाच्या लढाईत सर्वजण एक आहेत, यात कोणत्याही भेदभावाला जागा नाही. सेवा आणि सुविधा देण्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कोरोनाच्या लढाईत, हात, पाय स्वच्छ धुणे आणि आपल्या आणि परिसराच्या स्वच्छतेकडे पाहणे, हे आपल्या प्राथमिक कार्य आहे.'

पालघर मॉब लिंचिंगवर प्रतिक्रीया
'गरजवंताना मदत मिळायला हवी. कोणीही भीतीपोटी किंवा रागात कोणतेही चुकीचे पाउल उचलायचे नाहीये. राजकारण ज्यांना करायचे आहे, त्यांना करू द्या. पण, तुम्ही सर्वांनी त्याकडे लक्ष न देता, समाजसेवेची भावना मनात ठेवा. कोणत्याही चुकीच्या कृत्यात सहभागी होऊ नका. अशी कोणतीही समाजविरोधी घटना होत असल्याच, प्रशासनाला सांगा.'

'दोन संन्यास्यांची हत्या झाली, यावर अनेकजण आपले मत मांडत आहेत. ही घटना व्हायला नको होती, पोलिस काय करत होते, यात कोणाचा हात आहे, कोण दोषी आहे, कोणाला शिक्षा व्हायला हवी, अशी मत मतांतरे असतात. आपल्याला यावर लक्ष न देता, देश हिताचे काम करायचे आहे. दोन सन्यास्यांची हत्या झाली, ती व्हायला नको होती. पण, आता यावर कोणताही वाद न करता, कायद्याला आपले काम करू द्या आणि आपण समाज हिताची कामे करा.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post