कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतरच आयपीएलचे आयोजन करायला हवे




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्यानंतरच आयपीएलचे अायोजन करायला हवे. आम्हाला रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्यास कोणतीही अडचण नाही, असे ऑफ स्पिनर हरभजन सिंगने म्हटले. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या हरभजननेे म्हटले की, ‘या खेळावर अनेकांचा उदरनिर्वाह आहे. प्रेक्षक महत्त्वाचे असतात. मात्र, अशा परिस्थितीत अनुकूल नसल्यास मला विना प्रेक्षकांचे खेळण्यास अडचण नाही. एक खेळाडू म्हणून मला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार नाही, एकमात्र होईल प्रत्येक चाहता टीव्हीवर आयपीएल पाहू शकेल. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सतर्क राहावे लागले आणि खेळाडूंच्या आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आपल्याला नियोजित सामन्याचे स्थळ, संघाची हॉटेल, विमान आदी चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवावे लागेल. हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. जेव्हा सर्व काही ठीक होईल, त्यावेळी आयपीएलचे आयोजन केले जावे.’ बीसीसीआयने स्पर्धेला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. हरभजनने म्हटले, मला सामन्याची कमी जाणवत आहे. मला आशा वाटते, एक वर्षानी मी फायनलसह १७ सामने खेळू शकेल. मला मैदानावर न जाण्याची उणीव भासतेय आणि प्रत्येक चाहत्याला देखील त्याची आठवण येत असेल. अाशा आहे की, आयपीएल लवकरच सुरू होईल. तेव्हापर्यंत मला स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल. सध्या काेराेनाच्या भीतीमुळे यंदाच्या सत्रातील अायपीएलची स्पर्धा जवळपास रद्द हाेण्याच्या मार्गावर अाहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post