विम्याच्या जीएसटीवरही मिळवा करसवलत



माय अहमदनगर वेब टीम
टर्म प्लॅनमध्ये असे करा नियोजन : प्राप्तीकर नियमानुसार जीवन विम्याच्या हप्त्यापोटी एकूण दीड लाखाची करसवलत मिळू शकते. अर्थात जीएसटीचा भरणा केल्यानंतर मिळणारी करसवलत ही पॉलिसीनुसार वेगवेगळी राहते. टर्म प्लॅनमध्ये 18 टक्के जीएसटी आकारला जातो.जर एखादा व्यक्ती एक कोटीचा टर्म प्लॅनचा हप्ता 9 हजार रुपये भरत असेल आणि 18 टक्के जीएसटी असेल तर एकूण हप्ता 10,620 रुपये असेल. अशा स्थितीत संपूर्ण रक्कमेवर करसवलत घेऊ शकता.

यूलिपचे नियम वेगळे : यूनिट लिंक्ड प्लॅनचा हप्ता हा पॉलिसी आणि बाजार असे दोन विभागात विभागलेला असतो. याप्रमाणे पॉलिसीतील गुंतवणुकीच्या वाट्यावर जीएसटी आकारला जात नाही. तर यूलिपमध्ये जीएसटीचा दर हा 18 टक्के आहे.

जीवन विम्याला दिलासा: पारंपारिक जीवन विम्यात जीएसटी हा पहिल्या वर्षासाठी एकूण हप्त्याच्या 25 टक्के हिश्श्यावरच आकारला जातो आणि त्याचा दर 4.5 टक्के आहे. त्यानंतर पुढील वर्षात त्यावर एकूण हप्त्यावर 12.5 टक्के जीएसटी बसतो. साधारणपणे जीएसटी 2.25 टक्के दराने आकारला जातो.

गुंतवणुकीच्या कागदपत्रात उल्लेख करा: आपण नोकरदार असाल तर कंपनी आपल्याकडे गुंतवणुकीचे पुरावे मागते. आपल्या वेतनाच्या स्त्रोतावर कमी किंवा अधिक टीडीएस आकारला जाणार नाही, यासाठी कंपनी प्रयत्नशील असते. गुंतवणुकीचे पुरावे सादर करताना विम्या हप्त्याचे आकलन जीएसटीसह करावे. जीएसटी आणि हप्ता अशा एकूण रक्कमेचा उल्लेख विवरणात करावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post