या सवयीना कायमस्वरूपी ब्रेक लागणार








माय अहमदनगर वेब टीम
पेरिस - काेराेना व्हायरसचे आजच्या घडीला जगावर माेठे संकट आेढवले आहे. यामुळे सध्या जगाच्या कानाकाेपऱ्यातील चित्रामध्ये बदल हाेताना दिसत आहे. अशाच काेराेना व्हायरसच्या सावटानंतर क्रीडाविश्वातील जुन्या व पारंपरिक मानल्या जाणाऱ्या काही सवयींचा बळी जाणार आहे. काेराेनाच्या भीतीमुळे या सवयींना कायमस्वरूपी ब्रेक लागणार आहे.

1. स्विंगसाठी चेंडूला थुंकी लावणे
गाेलंदाज व इतर खेळाडू स्विंग करण्यासाठी चेंडूला सारखे-सारखे थुंकी आपल्याच हाताने लावत असल्याचे चित्र क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळते. कसाेटीत खास करून हे सर्वाधिक वेळा दिसून येते. मात्र, आता या सवयीचा बळी जाणार आहे. काेराेनाचा धाेका अद्यापही कायम आहे.

2. बाॅयल बाॅयकडून टाॅवेलची देवाण-घेवाण
टेनिस टेनिस सामन्यादरम्यान काेर्टवर खेळाडू हे सातत्याने माेठ्या संख्येत टाॅवेलचा वापर करताना दिसतात. यासाठी काेर्टनजीक एक बाॅल बाॅय ठेवलेला असताे. मात्र, आता याचा वापरही कमी हाेईल. जपान व इक्वेडाेर सामन्यात टाॅवेल देण्यासाठी असलेल्या बाॅल बाॅयच्या हातात ग्लोव्हज हाेते.

3. लढतीपूर्वीचे हस्तांदाेलन हाेणार बंद
जगभरातील जवळपास सर्वच खेळाडू हे झंुज देण्यापूर्वी एकमेकांशी हस्तांदाेलन करतात. हा अलिखित असा पारंपरिक नियम मानला जाताे. मात्र, आता काेराेनाच्या भीतीमुळे या चांगल्या सवयीलाही ब्रेक लागेल. यातून संक्रमणाचा धाेका असल्याची भीती कायम आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post