आरोग्‍य विभागाच्‍या वतीने मनपाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्‍या आरोग्‍याची तपासणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -देशात कोरोना विषाणू संसर्ग आजाराने थैमान घतला असून मानवी जिवनावर त्‍याचा विपरीत परिणाम झाला आहे. संपूर्ण देशाची वाटचाल विस्‍कळीत झाली आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नगर शहरामध्‍ये कोरोना विषाणू हद्दपार करण्‍यासाठी अहोरात्र कष्‍ट घेतले आहेत. आपला जीव धोक्‍यात घालून नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहण्‍यासाठी अहोरात्र परिश्रम केले आहे. नगर शहरामध्‍ये कोरोना संसर्ग थांबविण्‍यास प्रशासनाला कर्मचा-यांमुळे यश आले आहे. त्‍यांच्‍या आरोग्‍याची तपासणी होणे गरजेचे आहे यासाठी मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार यांनी कर्मचा-यांची तपासणी आज करून घेतली. महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज 33 टक्‍के कर्मचा-यांच्‍या उपस्थितीत सुरू झाले आहे. सर्व कर्मचारी नियम व अटींचे पालन करून आपले कामकाज करित आहेत. यापुढील काळात नगर शहरामध्‍ये कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपली काळजी घेतली पाहिजे. व घराच्‍या बाहेर न पडता घरात थांबावे मनपाच्‍या माध्‍यमातून सर्व उपाय योजना सुरू आहेत. मनपा अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्‍य चांगले राहावे यासाठी आज त्‍यांच्‍या आरोग्‍याची तपासणी करण्‍यात आली.




आरोग्‍य विभागाच्‍या वतीने अहमदनगर महानगरपालिकेच्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्‍या आरोग्‍याची तपासणी यावेळी करण्‍यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post