अहमदनगरकरांना दिलासा : 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; ७ रिपोर्टची प्रतीक्षा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे १८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित ०७ अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५३३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४५३ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७ जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post