हमाल-माथाडी कामगारांची अडणवूक पोलिसांनी थाबंवावी अन्यथा काम बंद आंदोलन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हमाल-माथाडी कामगारांचे ओळखपत्र ग्राह्य धरून त्यांची पोलिसांनी अडणवूक करू नये ,अन्यथा काम बंद आंदोलन करावे लागेल , असा इशारा जिल्हा हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिला आहे ते पुढे म्हणाले कि जिल्ह्यात हमाल,माथाडी,कामगार यांची संख्या असंख्य आहे आडतेबाजार ,रेल्वे माल धक्का ,व इतर ठिकाणी ते काम करतात तशेच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती ,माथाडी बोर्ड व जिल्हा हमाल पंचायत यांनी अधिकृत ओळखपत्रहि दिले आहे .हमाल ,माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आलेला आहे ,तरी सुद्धा लॉकडाऊन च्या काळात हे ओळखपत्र ग्राह्य न धरता पोलिसांकडून हमाल-माथाडी कामगारांची अडवणूक केली जाते ,प्रसंगी मारहाणही करण्यात येते ,आता तर पोलिसांनी ऑन लाईन पासचे आदेश काढले आहे .मात्र हमाल-माथाडी कामगारांना ते शक्य नाही.
हमाल-माथाडी वर्ग हा नगरपासून दहा ते बारा किलोमीटर परिसरतुन नगर शहर मध्ये कामासाठी येत असतो तो आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता काम करतो तेव्हा पोलिसांनी कामगारांकडे असलेले ओळ्खपत्रच ग्राह्य धरून त्यांची अडवणूक व मारहाण थांबवावी अन्यथा आम्हाला काम बंद करावे लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिला आहे .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post