विनापरवाना दारु वाहणाऱ्या इनोव्हासह दोघे एलसीबीच्या जाळ्यात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील लिंकरोडवरील भूषणनगर या ठिकाणी विनापरवाना दारु वाहतूक करणारी इनोव्ह कार पकडण्यात आली. दारु व गाडीसह ८ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना पकडण्यात आले असून अन्य दोघे फरार झाले आहेत. सिध्देश संदिप खरमाळे (वय २३, रा.भांडगाव, ता.पारनेर), संदेश सिताराम शिंदे (वय २४, रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्यां ची नावे असून, अर्जुन कांता काळे (रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर), अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) ही दोघे फरार झाली आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार नगर शहरातील लिंकरोड, भूषणनगर येथे सापळा लावून दोन पंचासमक्ष इनोव्हा (क्र.एमएच १६, बीएच ६३३४) ही पकडण्यात आली. यावेळी गाडीची तपासणी केली असता, १७ हजार ८२० रुपयांच्या ट्युबर्ग स्ट्रोंग बिअरचे ९ बाँक्स, १७ हजार ८२० रुपयांचा किंगफिशर बिअरचे ९ बाँक्स, ८ लाख रुपये किंमतीचे इनोव्हा असा एकूण ८ लाख ३५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाई दरम्यान सिध्देश संदिप खरमाळे (वय २३, रा.भांडगाव, ता.पारनेर), संदेश सिताराम शिंदे (वय २४, रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे असून, अर्जुन कांता काळे (रा.निमगाव वाघ, ता.जि.अ.नगर), अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) ही दोघे फरार झाले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ शिवाजी ढाकणे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ शिवाजी ढाकणे,
पोना सचिन आडबल, संतोष लोढे, पोकाँ रणजित जाधव, सागर ससाणे, प्रकाश वाघ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post