अखिलेश कुमार सिंह नगरचे नवीन एसपी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री. अखिलेश कुमार सिंह हे लवकरच सूत्रे हाती घेणार आहेत. श्री. अखिलेश कुमार सिंह हे पोलीस उपायुक्त, परिमंडळ -७ मुंबई शहर येथे कार्यरत होते. त्यांना त्वरित नगरला जाऊन पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे .

         पोलीस उपायुक्त मुंबई शहर पदाचा पदभार सहाय्यक पोलीस महानिरीक्षक ( नि.व.स )महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. अभिषेक त्रिमुखे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे. उपसचिव कैलास गायकवाड यांनी आज हा आदेश काढला यापूर्वी चे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे हा पदभार अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे होता ,  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अभाधित राखण्यात  ते यशस्वी ठरले.

      बऱ्याच दिवसापासून नगरचे पोलीस अधीक्षक पद रिक्त होते, नगरला पोलीस अधीक्षक मिळावा म्हणून अनेक वेळा मागणी करण्यात आली होती, अखेर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक मिळाले. श्री. अखिलेश कुमार सिंह यांच्यासमोर वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post