राज्याच्या राजकारणात जास्त रस



माय अहमदनगर वेब टिम
मुंबई- भाजपने राज्यसभेसाठी आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली. यात उदयनराजे, रामदास आठवले आणि डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी भाजप एकनाथ खडसेंना उतरवणार असल्याची चर्चा होती, पण तसे झाले नाही. यावर खडसेंनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. "राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. पण, मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती," असे खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ''पक्षाला योग्य वाटला, तो निर्णय त्यांनी घेतला. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा होती, पण मला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा नव्हती. मुळात मला राज्याच्या राजकारणात जेवढा रस आहे. तेवढा दिल्लीच्या राजकारणात नाही हे मी आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळेच माझ्या नावाचा विचार पक्षाने केला नसावा.''

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post