कोरोनाशी लढा : व्हेंटिलेटरने एकाच वेळी ९ रुग्णांना ऑक्सिजन



माय अहमदनगर वेब टीम
ऑटारियो -कॅनेडियन डॉक्टर अॅलन गॉथिअरच्या एका आयडियाने व्हेंटिलेटरच्या टंचाईचा सामना करत असलेल्या अमेरिकेला नवा दिलासा मिळाला आहे. अॅलनने एका व्हेंटिलेटरमध्ये किरकोळ बदल करत ते ९ रुग्णांना वापरण्याजाेगे केले आहे. यासाठी त्याने २००६ मध्येच हा प्रयोग करून बसलेल्या डेट्राॅइटच्या दोन डॉक्टरांचा एक व्हिडिओ पाहिला.

डॉ. अॅलन ओंटारियोतील एका हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थेटिस्ट आहेत. त्यांच्या कल्पनेला अब्जाधीश व टेस्लाचे सीईअो एलॉन मस्क यांनीही दाद दिली आहे. त्यांचे सहकारी अॅलन ड्रममाउंड यांनी या अनोख्या व्हेंटिलेटरचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तो भलताच व्हायरल झाला आहे. त्यांच्या ट्विटला ६९ हजार लाइक्स व १५ हजार रिट्विट्स मिळाले. कॅनेडियन माध्यमांनुसार, डॉ. अॅलनने व्हेंटिलेटरमध्ये एकापेक्षा जास्त होज पाइप जोडले. ते एका कॉम्प्युटरने ऑपरेट होतात. यात एकच प्रेशर रेग्युलेटर आहे. एकसारखा आकार व क्षमतेची फुप्फुसे असलेल्या रुग्णांना हे व्हेंटिलेटर लावले. डॉ. अॅलन म्हणाले, अत्यंत गरजेच्या काळात आमच्याकडे व्हेंटिलेटरची खूप टंचाई होती. आम्ही हवालदिल झालो होतो. मी प्रयत्न केला अन् यशस्वी ठरलो. हे व्हेंटिलेटर रुग्णांचे जीव वाचवत असल्याचे पाहून मनाला समाधान लाभत आहे. या व्हेंटिलेटरसाठी फार कमी खर्च आला आहे. डॉ. अॅलन हे डायफ्राग्मेटिक मशिनरीचे एक्स्पर्ट आहेत. ते म्हणाले, २०१७ मध्ये लास वेगास गोळीबारात जखमी झालेल्या लाेकांवर उपचारांसाठी मी हीच पद्धत अवलंबली होती. अॅलन यांच्या रुग्णालयाने आपल्या २ कॅम्पसमध्ये हे व्हेंटिलेटर बसवले आहे.

अमेरिकेच्या रुग्णालयांत व्हेंटिलेटरची अत्यंत टंचाई
अमेरिकेच्या ग्रामीण रुग्णालयांत व्हेंटिलेटरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एका अंदाजानुसार, सध्या १ लाख ७० हजारच व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. गरज मात्र ७ लाख ४२ हजारांची आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post