कोरोना इफेक्ट / लॉकडाउनमुळे अयोध्येतील राम मंदिर निर्माणांचे सर्व कार्यक्रम ठप्प, 4 एप्रिलची बैठकही रद्द


माय अहमदनगर वेब टीम
अयोध्या- देशभरात पसरत असलेल्या कोरोना व्यायरस संक्रमणामध्ये लॉकडाउन असेपर्यंत राम मंदिर निर्माणाचे सर्व काम स्थगित करण्यात आले आहेत. ट्रस्टच्या सदस्यांचे म्हणने आहे की, पंतप्रधान मोदींच्या अपीलवर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सध्या मंदिरापेक्षा कोरोनाशी सामना करणे महत्वाचे आहे. या लॉकडानमुळे 4 एप्रिलला अयोध्येत होणारी ट्रस्टची बैठकही रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 46 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
निर्मोही अखाड्याचे महंत दिनेंद्र दास यांनी सांगितल्यानुसार, आता भव्य राम मंदिराच्या गर्भ स्थळाची जागा रिकामी झाली आहे. याच्या सपाटीकरण आणि निर्माणाचे काम लवकरच सुरू होईल. 4 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत भूमिपूजनाची तारीख ठरणार होती. कोरोनाचे संकट पाहता, आता ही तारीख पुढे ढकलावी लागेल. निर्मोही अखाड्याने सांगितल्यानुसार राम नवमीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान भक्तांसाठी मंदिरातील प्रवेशही बंद करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post