भारतात बिटकॉइनवरील बंदी उठली



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने बुधवारी आदेश देत भारतामध्ये क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांना परवानगी दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर बंदी आणली होती. त्याविरोधात इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएमएआय) आक्षेप नोंदवत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच याचिकेवर बुधवारी सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने लावलेल्या बंदीमुळे देशभर बिटकॉइनसारख्या क्रिप्टो करन्सी व्यवहारांना लगाम बसला होता. परंतु, यामुळे क्रिप्टो करन्सीच्या बदल्यात होणारे वैध व्यवहार सुद्धा कोलमडले असा युक्तीवाद आयएमएआयने कोर्टात मांडला.

क्रिप्टो करन्सी चलन नाही, मग आरबीआयला बंदीचा अधिकार कसा -आयएमएआय

जस्टिस आर. नरिमन, अनिरुद्ध बोस आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. कोर्टात आपली बाजू मांडताना आयएमएआयच्या वकिलांनी सांगितले, की "मुळात क्रिप्टो करन्सी हे चलनच नाही. ती एक वस्तू आहे. अशात आरबीआयला त्यावर बंदी लावण्याचे अधिकार नाहीत. आरबीआयने क्रिप्टो करन्सीवर बंदी लावावी असा कायदा सुद्धा नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post