कोरोना ; महापालिकेकडून सर्वे व औषध फवारणी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरामध्ये मंगळवारी कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित रुग्ण ज्या ठिकाणी राहतो, त्याभागात सर्वेक्षण सुरू केले. यामध्ये कोणाला सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे आहेत का,याची खात्री केली जात आहे.अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.

कोरोनाचा मंगळवारी तिसरा रुग्ण शहरामध्ये आढळल्यानंतर महानगरपालिकेने त्याची विशेष दखल घेतलेली आहे. संबंधित रुग्ण ज्या भागात आढळलेला आहे, तो कुठे राहतो,याची घेतली असून त्याच्या शेजारी कोणकोण राहत आहे, त्याचे संपर्कात कोणकोण आले आहे याची  माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. याची माहिती घेऊन या भागात सर्वेक्षण सुरू केले.या अंतर्गत जवळपास तीन किलोमीटरचा परिसर घेतला जाणार आहे. तसेच सर्वेक्षणाची प्रक्रिया पुढील चौदा दिवस सातत्याने होणार आहे. याकाळात कोणाला सर्दी, खोकला व ताप असे लक्षणे आढळले तर त्याला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितास जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी सुद्धा या बाबतचा आढावा बुधवारी घेतलेला आहे. नगर शहरामध्ये सध्या महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये  औषध फवारणी मोहीम सुरू केलेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कुठला जर त्रास होत असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करावेत, असे आवाहनही केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post