७ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा झाली ४ हजार ८०७ कोटींची रक्कम


मुख्यमंत्र्यांकडून सहकार, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत ( ३ मार्च २०२० रोजी दुपारी १२ पर्यंत) १० लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरु केल्याबद्धल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला,आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास तसेच इतर अधिकारी व तंत्रज्ञांचे अभिनंदनही केले.


याविषयीचे मुद्दे :
पोर्टलवर अपलोड केलेली कर्जखाती : ३५ लाख ८०९
जाहीर झालेली कर्जखाती : २१ लाख ८१ हजार ४५१
पहिली यादी (चाचणी स्वरुपात)
२४ फेब्रुवारी रोजी : ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखात्यांची
दुसरी यादी २८ फेब्रुवारी रोजी :
१५ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार कर्जखात्यांची
ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती,यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या ६ जिल्ह्यांतील ५ लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार.
शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणीकरण पूर्ण: १० लाख ३ हजार ५७३
रक्कम प्रत्यक्ष जमा : आत्तापर्यंत ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post