सावेडीत चोरट्यांचा धुमाकूळ ; पोलिसांच्या गस्ती पथकाला चोरट्यांचे आव्हान


निलेश आगरकर
अहमदनगर - सावेडी उपनगरमध्ये आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पाच ते सहा मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत. तपोवन रोड भागामध्ये या चोर्‍या धूमस्टाईलने झाल्याचे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात महिलांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम तोफखाना पोलिसांकडून सुरू होते. 
दरम्यान, चोरांनी एकप्रकारे तोफखाना पोलिसांच्या विवंचनेचा फायदा घेतला असल्याचे दिसते आहे. त्यातच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहरातील चोर्‍या, घरफोड्या आणि धूमस्टाईलने होणार्‍या मंगळसूत्र चोर्‍या रोखण्यासाठी १० दुचाकी वाहनांवर ४० पोलीस कर्मचार्‍यांच्या गस्ती पथक स्थापन केले आहे. चोरांनी या मंगळसूत्र चोरी करून पोलिसांच्या या गस्ती पथकालाच आव्हान दिल्याचे दिसते आहे.  
पाच ते सहा मंगळसूत्रांच्या धूमस्टाईलने एकाच वेळी काही तासातच चोर्‍या झाल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण परसले आहे. चोरींनी या चोर्‍याद्वारे लाखो रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. चोरांनी या चोर्‍या अतिशय नियोजन पूर्वक केल्या असल्याची चर्चा सुरू आहे. शहर पोलिसांसमोर या चोर्‍या उघडकीस आणण्याचे आता आव्हान आहे. त्यातच तोफखाना पोलीस ठाण्याचा क्राईम रेषो दिवसेंदिवस जिल्ह्यात पहिल्या क्रमांक होवू  लागला आहे. वाढत्या क्राईम रेषोबरोबर गुन्ह्याचा उलगडा करण्यात देखील पोलीस अधिकार्‍यांना अपयश येताना दिसत आहे. तोफखाना पोलिसांचे ही उदासीनता सावेडीकरांसाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसते आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post