पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकरणाला धक्कादायक वळण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणातील चार आरोपी जेरबंद करण्याची विशेष कामगिरी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेसह कोतवाली, तोफखाना पोलिसांनी पार पाडली आहे. याप्रकरणीतील वास्तव परिस्थिती समोर आल्याने नारायण नबाजी मतकर, गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण प्रकारणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या घटनेला मिळालेली प्रसिद्ध, राज्यात उमटलेल्या प्रतिक्रिया याची गांभीर्याने दखल घेऊन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी सदर घटनेच्या तपास कामी मार्गदर्शन करून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांना सूचना दिल्या. त्यानुसार तपासासाठी तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी यांचे एक पथक, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांचे पथक या सर्व पथकांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास सुरु केला. या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी फिर्यादीमधील मजकूर तसेच नमूद केलेल्या आरोपीकडे केलेली चौकशीचा संशय निर्माण झाल्याने सदर गुन्ह्यातील पिडीत हिचा पती यांच्याबाबत गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. या माहिती दरम्यान, जवळचे मित्र गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना चौकशी कामी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याच्या बायकोने यापूर्वी काही जणांना विरुद्ध दाखल केलेल्या बलात्काराची केस पैसे घेऊन मिटविणार होता. परंतु समोरील लोक मिटविण्यासाठी पैसे कमी देत होते. त्यांना जास्त पैसे पाहिजे होते. त्याकरिता त्याला स्वतः ला व त्याच्या बायकोला बलात्काराच्या गुन्ह्यामधील आरोपींना नग्न करून मारहाण केली, असा व्हिडीओ तयार करून तो मिडियामध्ये व्हायरल करायचा जेणेकरून गुन्ह्यातील आरोपींना पोलिस तात्काळ अटक करतील. अटक आरोपी हे केस मिटविण्यासाठी जास्त पैसे देतील, असे सांगितले. त्यानुषंगाने कट रचला. तो आमचा जवळचा मित्र असल्याने त्याच्या सांगण्यावरुन आम्ही तिघांनी त्याला मदत करून त्याला व त्याच्या बायकोला विवस्त्र करून हातपाय बांधून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केली, त्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून मिडियात तो व्हायरल केला असल्याची कबुली दिली.

सदर तपासंती दोघा पत्नी व नवऱ्याला आणि मित्र गणेश सोपान झिरपे (रा.एकवीरा चौक, सिटी प्राईड हाँटेल मागे, कपिल अर्पामेंट फ्लॅट नं.८, अहमदनगर), अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे (रा.मढी, ता.पाथर्डी जि.अ.नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या विरुद्धात तोफखान्याचे पो.नि. मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ५५०/२०२०, भादवि कलम ३०७, २०१, १२०(ब), १८२ सही माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६७(ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी दिलेल्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उप अधीक्षक (गह) प्रांजली सोनवणे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे पो.नि.हारुण मुलानी, कोतवालीचे पो.नि.विकास वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार, सपोनि संदिप पाटील, शिशिरकुमार देशमुख, पोना रवि सोनटक्के, दीपक शिंदे, सफौ.मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, पोहेकाँ संदीप घोडके, पोना संतोष लोंढे, रवींद्र कर्डीले, प्रकाश वाघ, सागर सासणे, योगेश सातपुते, मयुर गायकवाड, चालक पोहेकाँ भोपळे तसेच तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी पथकाने ही कारवाई ही विशेष कारवाई केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post