घरफोड्या करणारी टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात घरफोड्या करणारी टोळी चार जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. समीर खाजा शेख (वय- २२ वर्षे, रा. सबजेल चौक, नगर), परवेज मेहमूद सय्यद (वय- १९ वर्षे, रा. भांबड गल्ली, भोसले आखाडा, अ.नगर), गणेश उर्फ गौतम संजय भंडारी (वय-२० वर्षे, रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, अहमदनगर) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी कि, दिनांक १०/०२/२०२० रोजीचे रात्री फिर्यादी सलीम अलीम अन्सारी (रा. कानडे मळा, सारसनगर, अ.नगर) यांचे सारसनगर रोडवरील भाजी मार्केट समोरील सौरभ बेकर्स पॉईंट हे दुकाम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानामधील तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ५५,०००/-रु. किं. चा ऐवज चोरुन नेला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेतील पोनि/दिलीप पवार हे त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने गन्द्याचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारांकडून माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा समीर शेख, रा. सबजेल चौक, अहमदनगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला
असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ/मनोहर गोसावी, विजय वेटेकर, पोना/रविन्द्र कर्डीले, सचिन आडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, सागर सुलाने अशांनी मिळून मिळालेल्या बातमीनुसार आरोपीचा शोध अटक केली.

आरोपींकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी ५,५००/-रु.किं. चे दोन मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली ५०,०००/-रु. किं. ची बिगर नंबरची सुझूकी अॅक्सेस मोटार सायकल असा एकूण ५५,५००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post