कामगारांनी कुठेही जाऊ नये, त्यांना मोफत राहणे-जेवणाची सोय करू!


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. तसेच काहीही करून घरीच राहा असे आवाहन केले आहे. ही परिस्थिती आणीबाणीची आहे. त्यामुळे, घरात कॅरम खेळा, पत्ते खेळा काहीही खेळा पण घरीच राहा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधतो. त्याचा अर्थ केवळ मी नाही तर महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील तुमच्याशी संवाद साधला असे समजावे. कारण, कोरोना विरोधात आम्ही सर्वच एक आहोत. मी राज ठाकरेंच्या देखील संपर्कात आहे. गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेने आणि या तमाम नेत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्येच आणखी एक निधी जोडला आहे. यातून कोरोनाग्रस्तांवरील उपचार आणि कोरोनाच्या संकटात पुकारलेल्या लॉकडाउनमध्ये उपाययोजना करण्यात मदत होईल. सकाळीच उद्योजक उदय कोटक यांचा फोन आला. त्यांनी या निधीमध्ये 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अनेक जण आम्ही काय करू शकतो आणि काय करावे म्हणून पुढाकार घेत आहेत. कुणी दान करत आहे, तर कुणी हॉस्पिटलचे सेट-अप उभे करून देत आहेत. मास्क कुठे मिळतील हे सांगत आहेत. आपली टीम एकूणच चांगली झाली आहे. कोणताही देश कुणाच्या मदतीला धावून येणे शक्य नाही. कारण सर्वांची प्रकृती एकसारखी आहे. त्यामुळे, आपल्यालाच आपली मदत करावी लागेल. इतर देशांमधील परिस्थिती पाहून आपण काळजी का घेत आहोत हे लक्षात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post