भिंगारच्या पाणीपुरवठ्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भिंगार शहराला आठ दिवसापासून पाणी पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे झाला नसून त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भिंगारकरांवर वणवण भटकंती करण्याची वेळ पुन्हा आली आहे. उन्हाळा नजिक येऊन ठेपला असून, पिण्याच्या पाण्याची आजच टंचाई निर्माण झाली तर उन्हाळ्यात भिंगारकरांना गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल काय? असा सवाल कॅन्टोंन्मेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रेसिडेंट आणि भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर. आर.पिल्ले यांनी केला.
भिंगारच्या तीव्र पाणी टंचाईबाबत अॅड.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली भिंगार काँग्रेस पदाधिकारी, नागरिकांचे शिष्टमंडळ कॅन्टोंन्मेंट बोर्डचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विद्याधर पवार यांना भेटले, त्यावेळी अॅड.पिल्ले यांनी कॅन्टोंन्मेंट बोर्डाचे लक्ष वेधले.
पाणी पुरवठा नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून भिंगारमध्ये निर्जळी आहे. पिण्याच्या पाण्यापासून भिंगारकर वंचित आहेत. पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत असून, तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत कॅन्टोंन्मेंट बोर्डाने अतिरिक्तखाजगी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. पाणी पुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली परंतु हे दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करुन पूर्ववत पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.
या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर, प्रवक्ते रिजवान शेख, रिक्षा युनियनचे अध्यक्ष जावेद शेख, संजय झोडगे, इम्रान पठाण, काका साळूंके, इमान इम्रान खान, अॅड. साहेबराव चौधरी, मजहर खान, सुभाष त्रिमुखे, तौसिफ खान, अनिल वर्हाडे, संतोष धीवर, बब्बू खान, संजय खडके, निजाम पठाण, लक्ष्मण साखरे, संतोष कोलते, दिपनंदन लोखंडे, वसिम सय्यद, समीर पठाण, सागर जाधव, संजय छत्तीसे, जालिंदर अळकूटे, संतोष फुलारी, सुनिल आल्हारे आदिंचा समावेश होता.
एमआयडीसीतून योजना राबविण्यासाठी मुंबईत बैठक घेऊ – आ.संग्राम जगताप
कॅन्टोंन्मेंट बोर्ड नंतर शिष्टमंडळाने आ.संग्राम जगताप यांची भेट घेऊन भिंगारचा पाणी पुरवठा कायमचा सोडवावा, त्यासाठी मिलिटरीवर अवलंबून न राहता भिंगारला एमआयडीसीहून थेट जलवाहिनी टाकून नवीन योजना राबवावी, अशी मागणी केली. राज्याचे जलसंधारणमंत्री, उद्योगमंत्री, कॅन्टोंन्मेंट बोर्डचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर, एमआयडीसी अधिकारी, लोकप्रतिनिधी आदिंची संयुक्त बैठकीत हा प्रश्न मांडून कायमचा सोडविण्याचा प्रयत्न आपण करु, असे आश्वासन आ.जगताप यांनी दिले.
Post a Comment