'या' निवडणुकीत भाजपाने दिला शिवसेनेला पाठिंबा


कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भिंगार येथील अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या शुभांगी साठे यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केल्याने बोर्डाच्या इतिहासात प्रथम शिवसेनेचा उपाध्यक्ष झाला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक सहा महिने पुढे ढकलल्याने विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ देताना गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे मुसद्दीक सय्यद यांच्या ऐवजी नवीन निवड करण्यात यावी अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आल्या होत्या. त्यानुसार नवीन उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि.4) सकाळी 11 वाजता कॅन्टोन्मेंट कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डात राष्ट्रवादीचे 3, शिवसेनेचे 3 व भाजपच्या 1 महिला सदस्या आहेत. पाच वर्षापुर्वी भाजपच्या शुभांगी साठे यांच्या पाठींब्यामुळे राष्ट्रवादीचे मुसद्दीक सय्यद उपाध्यक्ष झाले होते. यावेळी मात्र साठे यांचा पाठींबा मिळविण्यास शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे शिवसेना भाजपाचे संख्याबळ 4 झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पमतात आल्याने त्यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवार दिला नाही. परिणामी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड झाली.




कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर राणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्यासह शिवसेनेचे प्रकाश फुलारी, रविंद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, भाजपाच्या शुभांगी साठे, राष्ट्रवादीचे मुसद्दीक सय्यद, कलीम शेख व सौ. मीना मेहतानी आदी सदस्य उपस्थित होते. फुलारी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा शिवसेना उपनेते अनिल राठोड, भाजपाचे शहराध्यक्ष मिलींद गंधे, अॅड. अभय आगरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे, भाजपाचे शिवाजी दहिंहंडे, वसंत राठोड, महेश नामदे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post