लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर करा- अण्णा हजारे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेला लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधानसभेत सादर करून लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

शासन प्रशासनामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी जेणेकरून स्वच्छ शासन व स्वच्छ प्रशासन निर्माण होईल. तसेच गैरव्यवहाराला आळा बसावा हा लोकपाल, लोकायुक्त कायद्याचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हाती अधिकार मिळावा. क्लास एक ते चारचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या गैरव्यवहाराचा कोणत्याही नागरिकांना पुरावा मिळाला तर ते पुराव्यांच्या आधाराने केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी करतील त्यानुसार लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर करण्याची मागणी अण्णांनी केली आहे.

'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी केलेल्या उपोषणावेळी ग्रामसभेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची १० मार्च २०१९ रोजी मसुदा समिती तयार करण्यात आली व समितीने अनेक बैठका करत मसुदा तयार केला.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post