महापौरांच्याच वार्डातील पाणीप्रश्‍न गंभीर


नगरसेविका वंदना ताठे यांचे उपायुक्त यांना निवेदन
माय अहमदनगर वेेेेेेेेब टीम
अहमदनगर : प्रभाग क्र. ६ मधील भिंगारदिवे मळा येथील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे. नगर परिषद असताना जुनी पिण्याच्या पाण्याची चार इंची पाईपलाईन आहे. या भागाचा विस्तार झपाट्याने झाला आहे. लोकसंख्या मोठ्या वाढल्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी या भागास नवीन पाण्याची पाईपलाईन टाकून मिळण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना देताना सौ. नगरसेविका वंदना विलास ताठे. यावेळी परिसरातल महिला अलका गायकवाड, कायबाई खंडागळे, संगिता बर्डे, कमल कासवर, प्रतिका शेलार, रेखा बर्वे, सुनीता गिते, चंद्रकला हराळे, राहुल पवार, अक्षय बारवकर आदी उपस्थित होते.

निवेदन देताना ताठे म्हणाले की, आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. भविष्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात
निर्माण होणार आहे. तरी आताच या परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भूतकरवाडी चौक ते भिंगारदिवे मळ्यापर्यंत ४ इंची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने लवकरता लवकर उपयायोजना करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post