कर्जाचे आमिष दाखवुन व्यावसायिकाला फसविले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कमी व्याजदरात कर्ज करून देतो, असे सांगत एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याची घटना वडगाव पान (ता. संगमनेर) येथे घडली. 12 ते 23 जानेवारी दरम्यान ही घटना मोबाईलवरून घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बाळासाहेब विठ्ठल चौधरी (वय-37, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा हॉटेलचा व्यवसाय असुन त्यांना व्यवसायवाढीसाठी कर्ज हवे होते. अशा परिस्थितीत त्यांना 9867247611 या क्रमांकावरून नेहा राठोड तसेच 9004237738 या फोनवरून पुनम सखाराम कदम व 8693898317 या फोन वरून अमितसिंग व महेशसिंग अशा व्यक्तींनी फोन करून कर्जाचे आमिष दाखवुन त्यांच्याकडुन विविध कारणांसाठी 88 हजार रूपये घेतले व कर्ज न देता त्यांची फसवणुक केली.
याप्रकरणी बाळासाहेब चौधरी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे फसवणुकीया गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत.
Post a Comment