कांदा उत्पादकांना मोठा दिलासा ; कांद्यावरील निर्यातबंदी हटविली


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर लागू करण्यात आलेली निर्यात बंदी अखेर केंद्र सरकारने उठविली आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी यास्वरुपाची माहिती ट्टीव केली आहे. यंदाचे बंपर उत्पादन आणि स्थिर बाजारभावामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने १३ सप्टेंबर २०१९ मध्ये कांदावरील निर्यात मुल्य ८५० डॉलर केले होते. त्यांनंतर २९ सप्टेंबर २०१९ला कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्यातबंदी लागू केली होती. जानेवारीपासून कांदा दरात मोठी घसरण होऊनही निर्यातबंदी उठविण्यात आली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली. शेतकऱ्यांचे विविध शिष्टमंडळेही केंद्रीय मंत्र्यांना भेटले. राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारला पत्र पाठविले होते. यानंतर केंद्र सरकारकडून नुकतीच एक समिती कांदा दर आणि आवकेचा आढावा घेण्यासाठी आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने अखेर निर्यात बंदी उठविल्याची शक्यता मानली जात आहे.

कांदा निर्यात बंदी उठविली असली तरी किमान निर्यात मुल्याबाबत मंत्री पासवान यांच्या ट्विटमध्ये स्पष्टता नव्हती. मात्र, गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या २८.४ लाख टन तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात जवळपास ४० लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने मंत्री पासवान यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने कांदा उत्पादनाचा अंदाज आल्यानंतर विविध देशांबरोबर केलेले कांदा आयातीचे करार रद्द केले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post