ताजमहल पाहून आश्चर्यचकीत झाले ट्रम्प; म्हणाले 'ताजमहल, भारतीय संस्कृतीचे एक उत्तम प्रतीक


माय अहमदनगर वेब टीम
आग्रा - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारतीय दौऱ्यावर आहेत. अहमदाबादेतली नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर ते प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहल पाहण्यासाठी आग्र्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर सुद्धा आहेत.ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासोबत ताजमहल कँपसमध्ये वॉक करत फोटो सेशन केला. टूरिस्टगाइडने ट्रम्पआणि फर्स्ट लेडीला ताजमहलची माहिती दिली.

ट्रम्प यांच्या प्रवासाला खास बनवण्यासाठी विमानतळ ते ताजमहल पर्यंतच्या मार्गावरील 21 ठिकाणी 3000 कलाकार भारतीय कला आणि संस्कृतीचे त्यांना दर्शन घडवणार आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 12 वाजेपासून ताजमहल सामन्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

आग्रा येथे पोहोचल्यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्री योगी यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. तेथील कलाकारांनी लोकनृत्य सादर करून ट्रम्प परिवाराचे स्वागत केले. आग्राचे महापौर नवीन जैन पहिल्यांदाच भारतात आलेल्या ट्रम्प यांनी 600 ग्राम वजनी आणि 12 इंच लांब चांदीची चाबी, संगमरवरी ताजमहलचे मॉडल भेट देणार आहेत.

ट्रम्प गोल्फ कार्टने ताजमहलसाठी जातील
ट्रम्प ताजमहलच्या यलो झोनमध्ये 'द बीस्ट' कारने जाणार नाहीत. येथील 500 परिसरात त्यांना गोल्फ कार्ट (बॅटरीवर चालणारी) ने नेण्यात येणार आहे. एसपी सिटीने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनासाठी 25 गोल्फ कार्ट तयार करण्यात आल्या आहेत. गोल्फ कार्टच्या चालकांची अमेरिकन टीमने तपासणी केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सांगण्यात आले आहे. संपूर्ण मार्गाला 16 हजार कुंड्यांनी सजवण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post