दहशतवाद संपविण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ! ; पाकला फटकारले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदाबाद : जेव्हा दोन देशांचे नेतृत्व आपल्या देशातील जनतेच्या हितांचा सर्वोच्च विचार करते, तेव्हा त्या दोन देशांत मजबूत सहकार्य प्रस्थापित होणे सहाजिक आहे. आम्ही जगातील सर्वात चांगले हेलिकॉप्टर, रॉकेट, फायटर प्लेन बनवत असून, ही सर्वोत्कृष्ठ युद्धसामग्री भारतीय सैन्याला देत आहोत. त्यासाठी तीन अब्ज डॉलरच्या युद्धसामग्रीच्या खरेदीचा व्यवहारही आम्ही भारतासोबत करत आहोत, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. 'आम्ही इस्लामिक दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कठोर पाऊले उचलली असून, भारतालाही आपल्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका ही भारताच्यासोबत आहे. आम्ही पाकिस्तानला सीमेपलिकडील दहशतवाद संपविण्याचा इशारा दिला असून, ते त्यासाठी कठोरतने पाऊले उचलतील व दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करतील', असा सूचक इशाराही ट्रम्प यांनी दिला.
दोन दिवशीय भारत दौ-यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य स्वागतानंतर जगातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडिअम येथे 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तब्बल २७ मिनिटे ट्रम्प यांनी भारतीयांना संबोधित केले. याप्रसंगी ट्रम्प बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले. शिवाय, भारत-अमेरिका मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. ट्रम्प यांनी 'नमस्ते' म्हणत भाषणाला सुरुवात केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post