अहमदनगरमध्ये पोलिसांची नाकाबंदी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- वाहन चोरी व तत्सम गुन्ह्यांवर अंकुश लावण्याकरीता पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरात वाहन तपासणी मोहिम सुरू करण्यात आली होती. या वाहन तपासणीत वाहतूक नियंत्रण शाखेसह शहर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करुन वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करुन शासकीय महसूल गोळा केला.

दिल्लीतील हिंसक वातावरण तसेच राज्यातील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वाहन चोरीसह अन्य गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याकरीता पोलीस प्रशासनाने शहरातील महामार्गांवर वाहन तपासणी मोहिम सुरू केली आहे. या तपासणीमध्ये विशेषत: वाहनांचे क्रमांक, वाहनांचे कागदपत्र यावर जास्त भर देण्यात आला असून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हातमपूरा येथे करण्यात आलेल्या वाहन तपासणीमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत साडेबारा हजार रुपयाचा महसूल पोलिसांनी गोळा केला. ही वाहन तपासणी कोतवाली, तोफखाना व एमआयडीसी पोलीस, भिंगार कॅम्प पोलीस हे आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post