कामात कुचराई करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस


आ. संग्राम जगताप; प्रभाग 2 मधील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरात चांगल्या दर्जाची विकासकामे व्हावीत यासाठी पुढील 50 वर्षाचा विचार करुन कामे केली जात आहेत. कामाच्या दर्जात कुठलीही तडजोड झालेली खपवून घेतली जाणार नाही. विकासकामात हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी शिफारस करण्यात येईल, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला आहे.

महापालिकेच्या प्रभाग 2 मधील गुलाबनगर व संदेशनगर येथे आ. जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, नगरसेविका संध्या पवार, रुपालीताई वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, पोपट बारस्कर, जनाबाई तांदळे, कुसूम चौरे, सिमा आजबे, सुशिला जाधव, लता लांडगे, मंगल लहामगे, चंद्रकला देशमुख, प्रयागा केदार, काशिनाथ शिरसाठ, भानुदास देशमुख, बाबासाहेब लांडगे, बळीराम चौरे, प्रल्हाद जाधव, गणेश मोरे, सखाराम नायकवाडी, दिलीप गडकर, आदिनाथ लवांडे, आनंद नाकाडे, हरिश्चंद्र भोपे, अलका गडकर, मंदाकिनी नाईकवाडी, कुसूम नाकाडे, प्रविण आंतेपोलू, संभाजी काकडे, प्रशांत झिने, अनिल निमसे, राहूल खाणेकर, रविंद्र नाईकवाडी, प्रथमेश गोरे, प्रकाश पालवे, दत्ता टाक, योगेश पिंपळे, देवा आव्हाड, सतिश कनगे, भास्कर खेडकर, आदी उपस्थित होते.

आमदार जगताप पुढे म्हणाले, नगर शहर हे विकासकामांमुळे महानगराकडे वाटचाल करत आहे. शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

नगरसेवक सुनील त्र्यंबके म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास साधला जात आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटीबद्ध आहोत. सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post