थंड ठिकाणी शरीराचं तापमान का खालावतं?


माय अहमदनगर वेब टीम
थंडीच्या दिवसांत किंवा थंड ठिकाणी गेल्यावर अनेकांना हायपोथर्मियाचा त्रास जाणवतो. यावर तातडीने उपचार देणं फार गरजेचं असतं. हायपोथर्मिया या परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या शरीराचं तापमान अचानक खालावत. यामध्ये शरीरात उष्णता निर्माण होण्यापेक्षा अधिक वेगाने शरीराचं तापमान कमी होत जातं.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सामान्यपणे व्यक्तीच्या शरीराचं तापमान हे 98.6 F पर्यंत असतं. मात्र हे तापमान 95 F च्या खाली आलं की या परिस्थितीला हायपोथर्मिया म्हटलं जातं.
जेव्हा व्यक्तीच्या शरीराचं तापमान अचानक खालावतं त्यावेळी हृदय, मज्जासंस्था आणि शरीरातील इतर अवयव योग्यरित्या काम करत नाहीत. जर यावर वेळीच उपचार केले नाहीत किंवा याचं निदान झालं नाही तर हृदय निकामी होऊन श्वसन प्रणालीवर परिणाम होतो आणि मृत्यू ओढावू शकतो.
हायपोथर्मियाची लक्षणं : हायपोथर्मियाचं प्रमुख आणि पहिलं लक्षण म्हणजे हात थरथरणं. ज्यावेळी तुमच्या शरीराचं तापमान खालावत जातं त्यावेळी शरीर थंड तापमानापासून सुरक्षेसाठी आपोआप तयार होतं.

थरथरणं, बोलण्यात अडखळणं, नाडीचे ठोके मंदावणं, अशक्तपणा वाटणं, गोंधळणं, त्वचा लाल होणं. यासंदर्भात तज्ज्ञ म्हणाले, "हायपोथर्मियामध्ये व्यक्तीच्या शरीरातील तापमान अचानक कमी होतं. शरीराचं तापमान 30 अंशाच्या खाली गेलं की ही परिस्थिती उद्भवते. याचा परिणाम हृदयावर होतो. जर शरीराचं तापमान अधिकंच कमी झालं असेल तर हृदय काम थांबण्याची देखील शक्यता असते. यावर उपचार करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे अशा रूग्णांना सलाईन लावून उपचार दिले जातात. याशिवाय रूग्णाला गरम पाणी दिलं जातं किंवा ब्लॅकेटचा वापरही केला जाऊ शकतो."
दुसरे एक तज्ज्ञ म्हणाले, "या परिस्थितीमध्ये थंडीच्या वातावरणात शरीराचं तापमान खालावतं. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना ही परिस्थिती उद्भवण्याचा मोठ्या प्रमाणात धोका असतो. याशिवाय संधिवाताच्या रूग्णांनाही हा त्रास अधिक होऊ शकतो. ही परिस्थिती उद्भवली तर शरीराला ऊब मिऴणं फार गरजेचं असतं. यासाठी रूग्णाला गरम सूप प्यायला द्यावं. तसंच जाड ब्लॅंकेटही फायदेशीर ठरतं."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post